दानवली ग्रामसभा भेट अहवाल

Dhanovli visit Ganesh

गावाचे नाव :- दानवली

तालुका :-महाबळेश्वर,

जिल्हा :- सातारा

प्रस्तावना:- ग्रामपरी मार्फत निवडण्यात आलेल्या दानवली गावची ग्रामसभा दि.१५ आँगस्ट २०१५ रोजी जिल्हा परिषद शाळा दानावली येथे पार पडली त्याचा इति वृतांत पुढील प्रमाणे.

सकाळी ठीक ८.३० मिनिटांनी शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण झाले.यां वेळी संपूर्ण गावातील ग्रामस्थ,ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक वर्ग व ग्रामपरी सदस्य असे एकूण ६० ते ६५ लोक हजर होते. या वेळी ध्वजारोहण झाल्यानंतर  ग्रामसभेला सुरुवात झाली. प्रथमतःगावातील गुणवंत विध्यार्थी यांना पेन व वह्या यांचे वाटप झाले.या वेळी ग्रामपरी  मार्फत पुढील विषयांवरती ग्रामसभेत चर्चा झाली.

१)ग्रामसभेत ‘आदर्श गाव साठी’ गाव निवडीचे सर्व निकष सांगण्यात आले.

या वेळी ग्रामस्थांनी निकषांचे पालन करण्यात येईल व आम्ही ग्रामपरी सोबत काम करण्यास तयार आहोत असा ठराव मांडून तो सर्वानुमते संमत झाला.

२)शेोचालय बांधणी साठी ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन लवकरात लवकर आपापली शेोचालय बांधून वापर सुरु करावा तसेच शाळेसाठी शेोचालय साठी जागा उपलब्ध व्हावी या बाबत विषय मांडण्यात आले. या वेळी उपसरपंच यांनी आपण गावातील वाड्यां नुसार शेोचालय समिती स्थापन करून स्पर्धे द्वारे शेोचालयचे काम पूर्ण होईल असे सुचवले.

३) गावातील युवा वर्गाला असणारी इंग्रजी विषयाची समस्या पहाता ग्रामपरी मार्फत इंग्रजी चे प्रशिक्षण आठवड्यातून १ तास देण्यात येईल या विषयी चे नियोजन करण्यात आले.

४) हातमोजे :-

ग्राम सभेत महिला कमी होत्या तरी महिलांना आरोग्याच्या दृष्टीने हातमोजे शेतात काम करताना कसे उपयोगी पडतात या विषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली.

या नंतर गावातील महिला यांना एकत्र करून सर्वांच्या उपस्थितीत १६ घरातील शेतकरी महिला यांना ग्रामपरी सदस्या सुजाता खरात यांनी महिलां समोर स्वतः काम करताना आलेल्या अडचणी बाबत अनुभव कथन केले. त्याची विषयी महिलांची प्रतिक्रिया म्हणजे आम्हालाही  भात लागवण करताना हाताला चिखल्या होतात तर ,शेण काढताना आम्हाला अडचणीचे वाटते,त्या साठी तुम्ही सुचवलेला हा हातमोजे पर्याय असू शकतो असा आम्ही कधी विचार केला नाही.याचा आम्हाला निश्चित उपयोग होईल! असे सांगितले. या वेळी गणेश व सुजाता यांनी हात मोजे कसे वापरावयाचे,कधी वापरावयाचे या बाबत अधिक माहिती दिली व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले.

या मध्ये ग्रामपंचायत सदस्यांनी हि सहभाग घेतला.या वेळी एकूण १६ महिलांना हातमोजे वाटप करण्यात आले.व त्यांची पुढील पाठपुराव्या कामी माहिती घेण्यात आली.ती पुढील प्रमाणे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s