पुरस्कार!! ग्रामपरी आदर्श महिला सरपंच व आदर्श बचत गट पुरस्कार २०१४

ग्रामपरी, ग्रामीण व पर्यावरण केंद्र, हा IofC (पाऊले परिवर्तनाची) चा ग्रामीण विकासासाठी समर्पित उपक्रम असून या मार्फत पाणी, स्वच्छता व आरोग्य, पाणलोट क्षेत्र, नेतृत्व व प्रशिक्षण, स्वावलंबी उपजीविकेसाठी विविध प्रशिक्षणे व उपक्रम हे कार्यक्रम कार्यान्वित केले जातात. व्यक्तिगत बदलासाठी IofC ज्या सिद्धांतांवर काम करते ते सिद्धांत म्हणजे संपूर्ण प्रेम, पवित्रता, निस्वार्थिपणा व प्रामाणिकता. हे सिद्धांत ग्रामपरीच्या प्रत्येक कार्यक्रमांचे अविभाज्य घटक आहेत.

सामाजिक परिवर्तन घडविण्याकरिता प्रथमतः व्यक्ती मध्ये परिवर्तन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच व्यक्तिगत बदलाद्वारे सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी IofC काम करत आहे. प्रत्येकाला स्वतः मधील दोषांची जाणीव होऊन त्यापासून मुक्त होण्यासाठी व त्याद्वारे चांगल्या समाजाच्या निर्मीती मध्ये सक्रीय सहभागी होण्याची शक्ती प्रत्येकामध्ये जागृत करण्याचा प्रयत्न या केंद्रामार्फत केला जात आहे.

या विचारधारेच्या आधारावर ग्रामपरीने सातारा जिल्ह्यातील महिला सरपंचांना त्यांनी केलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामाकरिता गौरविण्याचे ठरविले आहे. यामध्ये महिला सरपंचांनी त्यांच्या कालावधीत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येईल. त्याचबरोबर त्यांच्या ह्या कामामुळे त्यांच्या गावामध्ये काय बदल झाला, त्यांच्या स्वतः मध्ये काय बदल झाला याचाही विचार केला जाईल. बदल घडविणाऱ्या गोष्टी कधी कधी फार छोट्या असतात, व कधी कधी त्याचा विचार केला जात नाही, परंतु हा प्रस्ताव करताना आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा विचार करावा ही अपेक्षा आहे. सरपंचानी केलेल्या छोट्या छोट्या कामांचा तसेच घेतलेल्या विविध निर्णयांचा अंतर्भाव आपण ह्या प्रस्तावामध्ये करावा.

त्याचप्रमाणे आदर्श महिला बचत गटांना पुरस्कार देताना त्या बचत गटाने सदस्य महिलांसाठी केलेले विविध उपक्रम, बचत गटांची आर्थिक उलाढाल, सामाजिक कामात सहभाग तसेच गटाने घेतलेल्या विविध निर्णयांचा अंतर्भाव या प्रस्तावामध्ये असावा.
सदर पुरस्काराद्वारे ग्रामपरी दोन महिलांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रोख रक्कम रु. २१०००/- व मानचिन्ह असे असेल, तसेच आदर्श बचत गटाला सुद्धा रोख रक्कम रु. २१०००/- व मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच ज्या व्यक्ती, संस्था, शासकीय अधिकारी प्रस्ताव करून पाठविणार आहेत त्यापैकी सर्वोत्तम तीन दर्जेदार प्रस्ताव निवडून त्यांना प्रत्येकी रु. १००००/- व मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.

या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०१३ पर्यंत आहे. त्यानंतर निवडलेल्या सरपंचांच्या गावाला व बचत गटांना भेटी देऊन त्यामधून दोन सरपंच व एक बचत गट निवडला जाईल. पुरस्कार प्रदान कार्यक्रम जानेवारी २०१४ मध्ये होईल.
या संबंधी अधिक माहिती करिता ग्रामपरी येथे ०२१६८ २४१८८४ / ८६००२५८६६२ / ७७०९६२००६६ या क्रमांकावर संपर्क साधावा. अर्जाचे नमुने या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी आपण या पुरस्कारसाठी प्रस्ताव सादर करावेत जेणेकरून आपल्या आदर्श कामाला प्रसिद्धी मिळेल, त्याचबरोबर या कामामुळे इतर महिला सरपंच, सदस्य व बचत गटांना प्रोत्साहन मिळेल व त्या अधिक उत्साहाने कामास सुरुवात करतील.

प्रस्ताव खालील पत्त्यावर पाठवावेत
ग्रामपरी
एम. आर. ए. सेंटर, एशिया प्लाटो,
पांचगणी – ४१२८०५
(लिफाफ्यावर ग्रामपरी आदर्श महिला सरपंच व आदर्श बचत गट पुरस्कार २०१४ असे लिहावे.)

Application form for Adarsh Sarpanch Purskar 2013 -14

Application form for Paper Presentation

SHG Award Application Form

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s